भारत बनला आशिया किंग

श्रीलंकेचा दहा विकेटने पराभवमोहम्मद सिराजचेसहा बळी

| कोलंबो | वृत्तसंस्था |

मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर नाव कोरले. कोलंबो येथे रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने कहर केला. सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव 50 धावांत आटोपला. श्रीलंकेचे हे माफक आव्हान भारताने एकही गडी न गमावता पार केले. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताने श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये मात दिली आहे. श्रीलंकेने दिलेले 51 धावांचे माफक आव्हान भारताने 6.1 षटकात आरामात पार केले. भारताने दहा गाडी राखून श्रीलंकेचा पराभव केला. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद 51 धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. शुभमन गिल याने 19 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावांची खेळी केली. तर ईशान किशन याने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 23 धावांची खेळी केली.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना लोटांगण घातले. जसप्रीत बुमराह याने पहिला फलंदाज बाद करीत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक सहा फलंदाज बाद केले सिराज याने एकाच षटकात चार फलंदाज बाद करणायचा पराक्रम केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या दहा षटकांच्या आत पाच गाडी बाद करण्याचा पराक्रम झाला. असा पराक्रम करणारा सिराज एकमेव भारतीय गोलंदाज आहे. हार्दिक पांड्या याने अखेरच्या तीन फलंदाजांन तंबूचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने श्रीलंकेचा50 धावांवर संपूर्ण संघ बाद केला. मोहम्मद सिराजने भारतासाठी दमदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. सिराजनेही एक षटक निर्धाव टाकले. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक फलन्दाज बाद केला. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. निसांका 2, परेरा 0, समरविक्रमा 0, असंलका 0, डी सल्वा 4 आणि शनाका 0 धावांवर तंबत परतले. आघाडीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Exit mobile version