भारत-श्रीलंका आमनेसामने
| कोलंबो | वृत्तसंस्था |
रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल रंगणार आहे. श्रीलंका संघ आशिया चषकाचा गतविजेता आहे, त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. भारताने आतापर्यंत सातवेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड आहे. परंतु, श्रीलंकेचा संघ नवखा असला तरी ऐनवेळी सामना फिरवण्याची ताकद असलेले खेळाडू त्यांच्याही संघात आहेत. त्यामुळे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करणारा संघच निर्विवाद वर्चस्व गाजवेल, यात शंका नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडअमवर फायनल रंगणार आहे. तब्बल सतरा सामन्यानंतर आशिया चषकाचा किंग कोण यावरुन पडदा उठणार आहे. पण, अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढतीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोमध्ये रविवारी ढगाळ वातावरण असेल. संपूर्ण दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
रविवारी कोलंबोच्या काही भागात पावसाची शक्यता आह. दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील फायनल सामन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर 4 फेरीत श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न श्रीलंका संघ करणार, यात शंकाच आहे.
श्रीलंकेची कामगिरी
श्रीलंका संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. गतविजेत्या श्रीलंका संघाने पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रलंका संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच गड्यांनी पराभव केला होता. त्यानंतर आफगाणिस्तानला दोन धावांनी हरवले होते. पण सुपर 4 मध्ये श्रीलंका संघाला भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरी भारतीय संघ तुफान फॉर्मात आहे.
भारताचे वर्चस्व
1984 पासून आतापर्यंत भारताने तब्बल सात वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली भारताने चषक जिंकला आहे. पाच वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारताने चषक जिंकला असून, यामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार मोहम्मह अझराउद्दीन आणि एमएस धोनी हे आहेत. या दोघांनी प्रत्येकी दोन वेळा भारताला कप जिंकवून दिला आहे. याशिवाय सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रोहित शर्मा यांनीही एक-एकदा भारताला आशिया चषक मिळवून दिला आहे.