दोन्ही संघांचा कसून सराव
| बार्बाडोस | वृत्तसंस्था |
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी विंडसर पार्क डॉमिनिका बुधवारी (12 जुलै) येथे सुरु होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने जिंकण्याच्या इराद्याने संघ उतरतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. या कसोटीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातर्फे पत्रकार परिषद आयोजित करणअयात आली होती. यावेळी अजिंक्य रहाणे कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होता, त्याच दरम्यान कर्णधार रोहित शर्मा तेथे आला. रोहित पत्रकार परिषदेत थेट घुसला आणि त्याने रहाणेलाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यादरम्यान तेथे पाऊसही पडला, त्यानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ या मालिकेसाठी नवीन जर्सी परिधान करेल. या नव्या जर्सीमधील भारतीय खेळाडूंचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना नवीन जर्सी आवडली नसल्याने या जर्सीला चाहत्यांनी खूपच ट्रोल केले आहे.नवीन कसोटी सामान्यांसाठीच्या जर्सीवर खांद्यावर निळे पट्टे आहेत. त्याचवेळी जर्सीच्या समोर लाल रंगात ‘ड्रीम 11′ चा लोगो आहे. जो लाल रंगात खूप ठळकपणे दिसत आहे. ड्रीम 11 भारतीय संघाचा नवीन प्रायोजक आहे. ड्रीम 11 चा बीसीसीआयसोबत 350 कोटींचा करार आहे. नव्या जर्सीमुळे चाहते खूप निराश झाले आहेत. त्यांनी ही जर्सी चांगली नसल्याचे म्हटले आहे. तर बऱ्याच चाहत्यांना वाटते की मबायजूसफ अधिक चांगली होती, तर काहींना वाटते की कसोटी जर्सी हळूहळू परंतु निश्चितपणे एकदिवसीय पोशाखात बदलत आहे. जर्सीमधला लाल रंग चाहत्यांना खूपच तिखट वाटला आहे. त्यामुळे कसोटी जर्सी जरा जास्तच रंगीबेरंगी दिसत असल्याचे म्हटले जात आहे. जणू ती कसोटी सामन्याची जर्सी नसून एकदिवसीय सामन्यांसाठीची जर्सी वाटतं आहे.
भारताचे नाव गायब
नवीन जर्सीमध्ये भारताचे नाव नाहीय. तसे, हे केवळ डीलमुळे केले गेले आहे. खरं तर, द्विपक्षीय मालिकेदरम्यान, टीम इंडियाच्या टेस्ट जर्सीच्या पुढच्या बाजूला जर्सीच्या प्रायोजकाचे नाव छापले जाते, तर आयसीसी टूर्नामेंटमध्ये देशाचे नाव लिहिले जाते. भारतीय संघ सध्या डोमेनिकाची राजधानी रोसेओ येथील विंडसर पार्क येथे प्रशिक्षण घेत आहे. सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असतील कारण हे दोन्ही फलंदाज सध्या खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. तर नवीन युवा खेळाडूंपैकी कोणाला संधी मिळणार यावरही सर्वांचे तितकेच लक्ष आहे.