श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या भारतीय संघातून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्याला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुल आणि ईशान यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे.

टी-20 मालिकेसाठी संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

एकदिवसीय मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडया (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Exit mobile version