| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 9 जूनपासून श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या वनडे तिरंगी मालिकेसाठी भारतीय ‘अ’ क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयनं या मालिकेत अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यात 15 वर्षीय डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा समावेश आहे. या तिरंगी मालिकेत तिलक वर्मा भारतीय ‘अ’ संघाचं कर्णधारपद भूषवेल, तर रियान पराग उपकर्णधार असेल. भारतीय ‘अ’ संघाव्यतिरिक्त, यजमान श्रीलंका आणि अफगाणिस्तान ‘अ’ हे तिरंगी मालिकेतील इतर संघ आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 21 जून रोजी खेळला जाईल.
श्रीलंकेत होणाऱ्या त्रिसंघीय मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाच्या वेळापत्रकात 9 जून रोजी यजमान श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध, त्यानंतर 11 जून रोजी अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध सामन्याचा समावेश आहे. भारतीय संघ 15 आणि 17 जून रोजी पुन्हा एकदा श्रीलंका ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ संघांचा सामना करेल. या त्रिसंघीय मालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये 21 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल. या वनडे त्रिसंघीय मालिकेतील सर्व सामने दंबुल्ला स्टेडियमवर खेळले जातील.
मालिकेसाठी भारतीय 'अ' संघ :
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अरशद खान







