वर्ल्डकप डायरेक्ट हॉलिबॉल स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य

। अलिबाग । वार्ताहर ।
दुबई येथे झालेल्या वर्ल्डकप डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत टांझानियाचा 21/6 व 21/3 असा पराभव करून भारताने अंतिम विजेतेपद पटकावले, भारतीय संघाचे कोच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रशिक्षक तथा राज्य क्रीडा संघटक शरद कदम हे होते. याआधी सेमी फायनलमध्ये कॅनडाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
कॅनडाने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. अंतिम फेरीत फुलचंदने नेट जवळून मारलेले बॉल विरुद्ध संघाला उचलताही येत नव्हते. त्याने प्रत्येक सामन्यात उत्तम खेळ केला तर सोयब बेगमपुरे यांच्या अप्रतिम सर्व्हिस शॉट तर यासिनने नेटमनची जबाबदारी उत्तम केली. कर्णधार बिपीन चहलने कोपर्‍यातून मारलेले बॉल व उपकर्णधार अंकुश पाठक यांने मिडलवरुन मारलेले शॉट प्रेक्षकांची वाहवा मिळवत होते. चिंतन, धीरज, बिरजू, मलिक, वासू यांनीही उत्तम खेळ करुन विजयात भर टाकली. भारतीने विजय प्राप्त केल्याबद्दल भारतीय डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा.डी.बी.साळुंके तसेच उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव प्रा.दिपक मोकल तसेच क्रीडा क्षेत्रातील वरिष्ठ, कनिष्ठ मान्यवर व राजकीय क्षेत्रातील मंत्री, खासदार, आमदार यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.

Exit mobile version