| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोक त्यात अडकली आहेत आणि त्यापैकी एक भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू राधा यादव आहे. गुजरात मधील वडोदरा पारिसरात राधा यादव पूरग्रस्त परिस्थितीत अडकली होती, परंतु एनडीआरफ टीमने तिला वाचवले आहे. राधा यादवने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एनडीआरफचे अधिकारी रस्त्यावर भरपूर पाणी असताना बोटीच्या मदतीने काही लोकांना वाचवत आहेत.