मुंबई | प्रतिनिधी |
ललित गोयल, आयरिओ ग्रुपचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रिअल इस्टेट समूह आयआरईओ चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. ललित गोयल यांच्या विरुद्ध, सुमारे सात कोटी 70 लाख अमेरिकी डॉलरच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास चालू होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ललित गोयलची अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल चार दिवस चौकशी केली. पँडोरा पेपर लीक प्रकरणातही गोयल यांचे नाव पुढे आले होते. यानंतर ईडीने आपल्या चौकशीला गती ही कारवाई केली आहे.