| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथे शासनाचे आदिवासी वसतिगृह आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कर्जत तालुका आदिवासी समाजाने उपोषण आंदोलने केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी कर्जत आदिवासी संघटनेने वसतिगृह येथे जाऊन विद्यार्थ्यांची आणि अधीक्षक यांच्यासोबत चर्चा केली. कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा यांच्या समवेत संघटनेच्या महिला अध्यक्षा कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळे, सुनील पारधी, सोमा निरगुडे, राजु झुगरे, गणेश पारधी, बाळू भगत, पोलीस भाऊ आघाण, शरद ठोंबरे, भरत आगीवले, हे पदाधिकारी नेरळ येथील आदिवासी वसतिगृह यांची पाहणी केली. आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने वसतिगृहाच्या अधीक्षक कांबळे तसेच सर्व विद्यार्थिनी यांच्या सोबत चर्चा केली. सध्या वसतिगृहात 56 विद्यार्थिनी निवास करीत असून तेथे राहून शिक्षणाचा लाभ घेत आहेत. आदिवासी मुलींचे वसतिगृह व्हावे यासाठी शासन दरबारी संघर्ष करून, प्रसंगी उपोषण, करून ज्यांनी या वसतिगृहाची निर्मिती झाली असल्याने दर काही महिन्यांनी आदिवासी संघटना शासकीय वसतिगृह येथे येवून पाहणी आणि चर्चा करीत असते.