। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील काही महत्वाच्या पॉईंट भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटकांच्या सुविधेसाठी रेडिमेड सुलभ शौचालय उभारले होते. परंतु, अनेक वर्षांपासून या शौचालयात पाण्याची गैरसोय झाल्यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यासाठी निसर्ग पर्यटन पॉईंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन कार्यतत्पर प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्याठिकाणी सुस्थितीत पाणी आणि स्वच्छता बाबतीत संबंधित कामगार वर्गाला सूचना केल्या आहेत. याबद्दल संतोष शिंदे यांनी राहुल इंगळे यांसह कामगार वर्गाचे आभार व्यक्त केले आहेत.