| रसायनी | वार्ताहर |
पिल्ले महाविद्यालय रसायनी आणि ग्रामीण रुग्णालय चौक आयसीटीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पिल्ले महाविद्यालयातील 65 एन.एस.एस. व रेड रिबन क्लब विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य लता मेनन, रेड रिबन क्लबच्या प्रमुख प्रा. कलावती उपाध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल आयसीटीसीचे समुपदेशक अशोक भिमराव लोंढे आदी उपस्थित होते.
दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमत्त माहिती देण्यात आली. एनएसएसच्या सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियानाची शपथ देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेड रिबन क्लब, एनएसएसच्या प्रमुख प्रा. कलावती उपाध्ये, ग्रामीण रुग्णालय समुपदेशक अशोक लोंढे, लॅब टेक्निशीयन विकास घुमरे आणि एनएसएस लीडर यश, सर्व रेड रिबन क्लब सदस्य यांचे असे सहकार्य लाभले.