। कानपूर । वृत्तसंस्था ।
भारत आणि बांगलादेश संघात होत असलेल्या दुसर्या सामन्यात पावसामुळे मोठा अडथळा आला आहे. शुक्रवारपासून कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून पावसाचा अडथळा आला आहे. आता पहिल्या दोन दिवशी जोरदार पाऊस झाल्यानंतर तिसर्या दिवशी मैदान ओले होते. यामुळे तिसर्या दिवशी मैदान खेळण्यासाठी योग्यप्रकारे न सुकल्याने या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात आत्तापर्यंत केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. या सामन्याच्या दुसर्या दिवशीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे पावसामुळे दुसर्या दिवशीही एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. याआधी पहिल्या दिवशी पावसामुळे नाणेफेककीलाही उशीर झाला होता. उशीराने झालेली नाणेफेक भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.