शहापूर परिसरातील गावे उध्वस्त करण्याचा डाव

10 महिने पोहोच रस्ता बनवलाच नाही
| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरातील गावे उद्धवस्थ करण्याचा डाव सरकारने घातला असल्याचा आरोप या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजन भगत यांनी केला आहे.

शहापूर धेरंड येथे 1 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या बांधफुटी मुळे व ती 10 महिने दुरुस्त न केल्यामुळे सुमारे 500 एकर भातशेती नापीक झाली आहे. त्याच बरोबर गावा पर्यत खारेपाणी येऊन घरापर्यंत घुसले आहे. याच भागात एमआयडीसीसाठी 900 एकर पूर्व पश्‍चिम बाजूस संपादन झाले आहे. गावे संपादना मधील अडचण ठरत आहे.त्यामुळे ही गावे बुडवून तेथील रहिवाशाना हद्दपार करण्याचा डाव एमआयडीसी व खारभूमी करीत आहे.

नोव्हेंबर 21 मध्ये या बांधफुटीवर आवश्यक मटेरियल नेण्यासाठी पोहोच रस्त्याची अवश्यकता असल्याने तहसीलदार यांच्या अध्यक्षते खाली बैठक होऊन पोहोच रस्त्याचे अंदाज पत्र बनवण्याचे निर्देश दिले होते. परंतु 7 महिने होऊन देखील प्रत्यक्ष कोणतेही कार्यवाही झाली नाही.दरम्यानच्या काळात गडथ कंपनीच्याील1 उडठ फंडातून पोहोच रस्ते व्हावे अशी मागणी. 1 जिल्हाधिकारी रायगड 2 आमदार महेंद्र दळवी 3 आमदार जयंत भाई पाटील यांच्या कडे केली होती या सर्वांनी या प्रस्तावास अनुकुलता दर्शवली आहे. परंतु त्यामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही.असा आरोपही भगत यांनी केला आहे.

जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी श्री कुमार यांनी देखील पोहच रस्त्यासाठी राख मिश्रीत माती देण्याचे मान्य केले परंतु 2.4 किलोमीटर रस्त्यावर पूर्णता माल पुढे नेण्यास नकार दिला आहे.

मोठे शहापूर धाकटे शहापूर व धेरंड ही तिन्ही गावे भरती रेषेच्या 2 मीटर खाली आहेत. तसेच 5000 हजार लोकवस्ती एक हायस्कूल, 3 मराठी शाळा, 3 अंगणवाड्या, 5 स्मशान भूमी, 165 जिताडा तलाव,2000 नारळाची पिकती झाडे हे सर्व खार्‍यापाण्या खाली येऊन उध्वस्त होणार आहे. पोहोच रस्त्यावर काम करण्यासाठी सुमारे 95 नोदंणी कृत मजूर काम करण्यास तयार आहेत मुख्य अभियंता जलसंपदा / खार भूमी यांने मोठेपाडा शहापूर खाजगी खारभूमी योजनेचे नूतनी करण पूर्ण अंदाज पत्र बनवून कॅबिनेट नोट साठी बनवून पाठवले आहे. खारभूमी विभागाने जरी बांधाचे नूतनी करण करायचे ठरविले तरी पोहच रस्ता शिवाय बांधाचे नूतनी करण करणे शक्य नाही. जर पोहच रस्ता झाला नाही तर 16 ठिकाणी झालेली खांड फुटी दुरुस्त होणार नाही आणि मग या गावांचे पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि मग इतिहासात केवळ पोहोच रस्ता न झाल्यामुळे गावांचे पुनर्वसन अशी महसुली नोंद होईल.अशी भीती या परिसरातील सामाजिक कार्य्कर्ते अरविंद पाटील, अमरनाथ भगत, बबन म्हात्रे, महादेव थळे , प्रा.सुनील नाईक.आदींनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version