| मुंबई | प्रतिनिधी |
फेअर प्ले या बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दोघांना अटक केली. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 344 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या बेकायदा प्रक्षेपणाप्रकरणी ईडी तपास करत आहे. तसेच आयपीएल प्रसारणसह फेअर प्ले ॲपद्वारे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे.
चिराग शहा व चिंतन शहा अशी अटक आरोपीची नावे आहेत. आरोपीं फेअर प्ले बेटिंग ॲपचे टेक्निकल व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पहायचे. दोघेही याप्रकरणातील संशयीत मुख्य आरोपी क्रीश शहा याच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने फेअर प्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार वायकॉम 18 नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.