मुंबई गोवा हायवेवर इर्टीगा कारला दुचाकीची धडक

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
मुंबई गोवा हायवेवर खारपाले गावाजवळ इर्टीगा कारला पाठीमागुन दुचाकी ठोकर दिली. शालीमार हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. 10 मे रोजी दापोली जि.रत्नागिरीत राहणाऱ्या इर्टीगा कारक मालक हा मुंबई गोवा हायवेने मुंबईच्या दिशेने जात होते. खारपाले येथील शालीमार हॉटेल जवळ आल्यावेळी हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल स्वाराने हा पाठीमागुन इर्टीगा कारवर आदळला. या अपघातात मोटार सायकल स्वर किरकोळ जखमी झाला आहे वर यात र्टीगा कारचे नुकसान झाले आहे.
याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version