वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पनवेल जवळ एका 35 ते 40 वर्षांच्या अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खांदेश्‍वर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर पनवेल जवळ एका अज्ञात वाहनाने 35 ते 40 वर्षांच्या व्यक्तीला धडक दिली. खान्देश्‍वर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथे तात्काळ दाखल संबंधित व्यक्तीला उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खान्देश्‍वर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version