। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. हा अनोळखी इसम पुणे ते मुंबई जुने हायवे रस्त्यावरील दांड फाट्यापुढे यश लॉजच्या बाजूला रस्त्याच्या कडेला जात होता. याचवेळी अनोळखी वाहनाने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या इसमाचे वय 35 वर्ष, वर्ण सावळा, उंची साडेपाच फूट, केस काळे, बांधा मजबूत आहे. त्याच्या उजव्या दंडावर तीळ, कपाळावर मधोमध तीळ, अंगात पांढरा शर्ट आहे. या मृत इसमाबाबत अधिक माहिती असल्यास पोलीस नाईक प्रदीप पोपेटे यांच्याशी संपर्क साधावा.







