। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
तलावात पडून 38 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. दिनेश दत्ताराम पाटेकर असे मृताचे नाव असून तो चेतूज फार्म हाऊस, मालडुंगे येथे केअरटेकर म्हणून काम करतो. 22 ऑक्टोबर रोजी मालडुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या तलावात पडला. मात्र त्याला बाहेर पडता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत







