ट्रकच्या धडकेत इसमाचा मृत्यू

| पनवेल । वार्ताहर ।
तक्का येथील शिवशंभो नाका येथे ट्रकचालकाने निष्काळजीपणाने अतिवेगाने वाहन चालवुन धडक दिल्याने एक अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रकचालक राजेशकुमार यादव याने त्याच्या ट्रकने दिलेल्या धडकेत एका अनोळखी पादचारी मृत्यू झाला आहे. सदर इसमाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे असून वर्ण सावळा, चेहरा उभट, दाढी मिशा काळी पांढरी वाढलेली, गळयात कवडयाची तसेच रूद्राक्षांच्या मण्यांच्या माळा, उजव्या हाताचे दंडावर हनुमानाचे चित्र गोंदलेले, तसेच उजव्या हातात लाल रंगाचे धागे बांधलेले आहे. तसेच अंगात प्रिंटेड सॅन्डो बनियन व फिकट काळया जिन्स पॅन्ट घातलेली आहे. सदर इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक लाला लोणकर यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version