। अलिबाग । वार्ताहर।
सन 2019-20 चे एन.एस.एस. पुरस्कार मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेजने तिहेरी पुरस्कार मिळवून बाजी मारली आहे. जे.एस.एम. कॉलेजच्या एन.एस.एस. युनिटला मुंबई विद्यापीठातर्फे रायगड जिल्ह्यातील ङ्गबेस्ट एन.एस.एस. युनिटफ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद अमृते याला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा विद्यापीठस्तरीय पुरस्कारफप्राप्त झाला आहे. महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अद्वैत घाटपांडे यांना रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष मा.अॅड. गौतम पाटील, सेक्रेटरी अजित शाह, मिलिंद पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव व तत्कालीन एन.एस.एस. संचालक प्रा. सुधीर पुराणिक, रायगड जिल्हा समन्वयक प्रा. टी. पी. मोकल, महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.