अभिनेता जॅकी श्रॉफ लपून-छपून माथेरानमध्ये पोहोचला

श्रावणात घेतले श्री पिसारनाथ महाराज यांचे घेतले दर्शन

| नेरळ | संतोष पेरणे |

शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असला तरी माथेरानमध्ये येवून श्रावण महिन्यात एकदा तरी भेट देणारे अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी श्री पिसारनाथ महाराज मंदिरात येवून त्यांचे दर्शन घेतले. तसेच माथेरानमधील आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ हे माथेरानच्या प्रेमात अनेक वर्षे आहेत. माथेरानमधील निसर्गाच्या प्रेमात पडलेले जॅकी श्रॉफ या थंड हवेच्या ठिकाणी किमान 40 वर्षे येत आहेत. माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले जॅकी हे प्रथम शहरात आणि प्रेक्षणीयस्थळी भेट देत असताना माथेरानचे आराध्य दैवत श्री पिसारनाथ महाराज यांच्या मंदिरात पोहचले. शार्लोट लेक परिसरात निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात आल्यानंतर माथेरानचे आराध्य दैवत अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे देखील आराध्य दैवत बनले. पुढे न चुकता वर्षातून किमान एकदा तरी जॅकी श्रॉफ हे माथेरानमध्ये आपल्या कामाला बाजूला ठेवून येत असतात. माथेरान येथे आल्यावर शहरातून चालत चालत पिसारनाथ महाराज मंदिर येथे जावून दर्शन घेवून पुन्हा त्याचदिवशी पुन्हा मुंबईकडे प्रयाण अशी दिनचर्या जॅकी श्रॉफ यांनी आजतागत कायम ठेवली आहे. जॅकी श्रॉफ यांनी माथेरानच्या सहवासात अनेक मित्र जमवले. त्यापैकी निमेश मेहता हे एक. मुंबई-माथेरान-मुंबई अशा प्रवासात ते कायम जॅकीसोबत असतात. इतकेच नाही तर तसेच आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी जॅकी माथेरानमधील आपल्या मित्रांच्या मदतीने किंवा स्वतः येवून श्री पिसारनाथ महाराज यांचा अभिषेक घालून चित्रपटाला रसिकांची साथ मिळावी, असे साकडे घालतात. अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या आयुष्यात माथेरान आणि माथेरानमधील श्री पिसारनाथ महाराज मंदिर यांचे अढळ स्थान आहे.


आज अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून दुपारी माथेरान येथे पोहचले. माथेरान येथील दस्तुरी नाका येथे आल्यावर जॅकी मित्रांसमवेत मिनी ट्रेनमधून माथेरान रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर नीमेश मेहता यांच्या सोबत श्री पिसार नाथ मंदिराकडे चालू लागले. तब्बल अडीच किलोमीटर अंतर चालत मित्रांसोबत मौजमजा करीत मंदिरात पोहचले. तेथे श्री पिसारनाथ महाराज यांचे दर्शन घेतल्यावर तेथील स्थानिक दुकानदार मेघा कदम यांच्या लहानशा हॉटेलात वडापाव खात पुन्हा पायी माथेरान शहरात आले. तेथे जवळचे मित्र निमेश मेहता यांच्या हॉटेल लॉर्ड्स येथे काहीवेळ थांबून पुन्हा माथेरान स्थानकातून मिनी ट्रेनमधून दस्तुरी असा प्रवास करून आपल्या वाहनाने मुंबईकडे केले.

मुकेश भाई यांची परंपरा निमेश यांच्याकडून कायम
माथेरानमध्ये पहिल्यांदा आल्यावर माथेरानमधील मुकेश मेहता यांच्याशी निर्माण झालेले ऋणानुबंध जॅकी श्रॉफ यांनी 40 वर्षांहून अधिक काळ टिकविले आहेत. सुरुवातीला माथेरानमध्ये आल्यावर मुकेश मेहता यांची साथ जॅकी यांना मिळत होती. आज निमेश मेहता हे जॅकी श्रॉफ माथेरानमध्ये आल्यावर यांच्यासोबत कायम असतात.
मुक्काम असेल तर बार हाऊस
माथेरानमध्ये आल्यावर राहण्याची इच्छा झाली तर माथेरानमधील हेरिटेज म्हणून क्रमांक एकवर असलेले बार हाऊस येथे थांबतात. मात्र मागील काही वर्षात जॅकी हे माथेरान भेटीला आले पण राहण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे पुढच्या भेटीत नक्कीच दोन दिवस राहण्यासाठी येणार असल्याचा शब्द जॅकी श्रॉफ यांनी दिला आहे.
Exit mobile version