जगदीश गायकवाड रुग्णालयात दाखल

| नेरळ | प्रतिनिधी |

मारहाण प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले रिपाई नेते जगदीश गायकवाड यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारांसाठी कळंबोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी कर्जत पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

रात्री नऊ च्या सुमारास कर्जत पोलीस यांच्या वाहनातून गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. तेथे कर्जत पोलिसांचे एक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे पथक तैनात असून कोणत्याही खासगी व्यक्तींना गायकवाड यांना भेटू दिले जात नाही आणि त्याचवेळी त्यांचे कुटुंबीय यांना भेट दिली जात असताना त्यांचे मोबाईल फोन मात्र पोलीस आपल्या ताब्यात घेत आहेत.

सोशल मीडियावर कर्जत तालुक्यातील तांबस गावातील तरुणाने आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल त्या तरुणाला जाब विचारण्यासाठी आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड हे 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पनवेल येथून कर्जत येथे आले होते. त्यावेळी त्यांचे सोबत 25 जण उपास्थित होते आणि त्यावेळी झालेल्या हाणामारीत तिघे गंभीर जखमी झाले होते. त्याबाबत तांबस येथील सुशील जाधव या तरुणाने कर्जत पोलिसात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा नोंद झाला होता.

Exit mobile version