चवदार तळ्यावर नतमस्तक
। महाड । प्रतिनिधी ।
चवदार तळे स्मृतीदिनाचा सोहळा महाडमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो भीम अनुयायांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करीत आठवणींना उजाळा दिला. जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. सत्याग्रहाचा 95 वा वर्धापनदिन महाडमध्ये साजरा करण्यात आला, पालकमंत्री अदिती तटकरे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर,रिपब्लिकन सेनेचे आंनदराज आंबेडकर, बौध्दजन पचायत समितीच्या मीराताई आंबेडकर,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे,भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम आदीनी चवदार तळे परिसराला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.स्थानिक प्रशासनाकडून क्रांती स्तंभ आणि चवदार तळे येथे मंडप व्यवस्था,पिण्याचे पाणी आरोग्य मदत इत्यादी सोय करण्यांत आली होती,स्थानिक विविध संस्थां तर्फे मोफत भाजनदान व्यवस्था करण्यांत आली होती,त्याच बरोबर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,,डॉ बाबासाहेब आंबेडकर बहूजन विकास संस्था,हिंदुस्थान पेट्रोलियम ,एलआयसी,एसटी कामागर,पोलादपुर सहकारी सरकारी कर्मचारी पतसंस्था,एकविरा पतसंस्था,चवदार तळे विचार मंच इत्यादी संघटनां कडून भोजनदान त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्ंयात आली होती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ.हर्षदिप कांबळे,समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रभाकर नारनवरे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे धम्मज्योती गजभिये,पुजनीय राहूल बोधी महाथेरो,शाहिर संभाजी भगत,इत्यादी प्रमुख मान्यवरांनी देखिल आपली उपस्थिती लावली होती.