। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. ते आता विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेणार असून त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. गेली पाच वर्षे बीसीसीआयचे सचिव या नात्याने जय शाह यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. जगातील बहुतांश क्रिकेट बोर्डांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे या पदासाठी जय शाह यांच्यासमोर कोणते आव्हान उभे राहिले नाही. काही दिवसांपूर्वी आयसीसीने सलग दोन वेळा ही जबाबदारी सांभाळणार्या ग्रेग बार्कले यांचा राजीनामा जाहीर केला होता. आयसीसीच्या घटनेनुसार, सलग 3 टर्म अध्यक्ष होण्याची तरतूद आहे. मात्र न्यूझीलंडच्या बार्कलेने तिसर्या टर्मला नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीनेही जय यांच्या नावाची घोषणा केली. 1 डिसेंबर ते पुढील 6 वर्षे ते अध्यक्ष राहू शकतात.