| पनवेल | प्रतिनिधी |
बी.बी बांठिया ज्वेलर्स परिवार कडून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याबद्दल बी. बी. बांठिया समूहाचे मालक राजेश बांठिया यांच्या हस्ते विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांना जेम्स ऑफ पनवेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पनवेल शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर, समाजसेवक गिरीश गुणे यांना व समाजसेवकांना जेम्स ऑफ पनवेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ममता म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, बी.बी.बांठिया समूहाचे डायरेक्टर गौरव बांठिया, वैभव बांठिया, सुयोग बांठिया व इतर मान्यवर उपस्थित होते.






