आरोग्यवर्धक जांभळ पेणच्या बाजारात

सामान्यांना सहज परवडणारे फळ, आयुर्वेदात जांभळाला महत्त्व प्राप्त

| पेण | प्रतिनिधी |

आरोग्यासाठी उपयुक्त फळ म्हणून जांभळाला पसंती दिली जाते. जांभूळ आख्यान आरोग्य क्षेत्रातील आवडीचे व सामान्यांना सहज झेपेल असे परवडणारे फळ. मात्र गेल्या दोन वर्षापर्यंत 200 रूपये प्रतिकिलो दराने मिळणार्‍या जांभळाचा दर हापूस आंब्याच्या भावाच्या बरोबरीने विक्री होत आहे.

एक काळ असा होता की, कोकणात उन्हाळयाची सुट्टी आणि मुलांसाठी मज्जा मस्ती असायची. यामध्ये खासकरून करवंद, रांजण, तोरण, आणि जांभळं वेचण्याची व काढण्याची जणू काही शर्यतच असायची. हमखास गावाकडे रस्त्याच्या कडेला, डोंगर माळरानावर जांभळाची झाडे बहुतेक ठिकाणी आढळायची. वार्‍यांच्या लहरी सोबतीने टपटप पडणारी जांभळे, रांजण, वेचयाचा आनंद सुट्टीत मुलांना अनुभवता येत असतं.

मात्र, कालपरत्वे झपाटयाने होत असलेले शहरीकरण यामुळे ही झाडे आता दुर्मिळ झाली आहेत. महामार्गावरील कडेने उपजत असलेल्या या झाडावर रस्ता रुंदीकरणात शेकडो जांभळाची वृक्षतोड झाली आणि फळांची कमतरता, मागणी जास्त त्यामुळे आरोग्यवर्धक जांभळ कळत-नकळत किलोमागे केव्हा शंभरी गाठली हे समजलेच नाही. आता तर हापूस आंब्याच्या भावानेच जांभळांचा भाव बधारला आहे. साधारणपणे जून महिन्यात वट पौर्णिमेपर्यंत जांभळाची आवक बाजारात असते, कारण ज्या प्रमाणे जांभूळ हे आरोग्यवर्धक आहे तसेच वटपौर्णिमेला हमखास महिलांच्या वानामध्ये जांभूळ हे फळ आढळून येते.

आज आयुर्वेदात जांभळाला महत्त्व प्राप्त झाला आहे. जांभळ खाल्याने शुगर कमी होते. अनेक पोटाच्या व्याधी बर्‍या होतात. एक काळ असा होता की, रस्त्याच्या कडेला पडणारी जांभळ वेचून कोकणात त्याचा उपयोग दारू निर्मितीसाठी केला जात असत. परंतू आता दिवसेंदिवस जांभळांची झाड कमी होत चालल्याने त्याचा परिणाम भावावर होत असून जांभळाचे भाव दामदुप्पट झाले आहेत.

Exit mobile version