भालाफेकीत नीरज चोप्रा अंतिम फेरीत

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारी पार पडलेल्या अ गटातील पात्रताफेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलाय. कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला.

पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये 83.50 मीटरपर्यंत भाला फेकणार्‍या किंवा सर्वोत्तम 12 खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. मात्र हे उत्तम 12 खेळाडू गट अ आणि ब मधून एकत्रितपणे निवडले जातात. ब गटामधील स्पर्धा अजून बाकी आहे. तसेच अ गटामधील काही स्पर्धकही अजून शिल्लक आहेत. मात्र असं असलं तरी नीरजला या सर्वाची चिंता करण्याची गरज नाही. कारण नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे 83.50 पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्‍चित केलं आहे.

नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला हा तब्बल 86.65 मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अ गटामध्ये नीरज 15 व्या स्थानी होता. विशेष म्हणजे नीरजने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. फिनलॅण्डच्या लेस्सी इतीलातोलोसुद्धा अशाचप्रकारे अंतिम फेरीमध्ये गेलाय.
ऑलिम्पिक स्टेडियममध्ये 7 ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. मंगळवारी भारताच्या अन्नू राणीला पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने ती स्पर्धेबाहेर फेकली गेली.

Exit mobile version