| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील डेरवली गोकुळ सोसायटीतील एका घरातील बेडरुममधील लाकडी कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबबत अधिक माहिती अशी की, गोकुळ सोसायटीत राहणाऱ्या वैशाली शेळके यांच्या रुम नं. 404 मधील बेडरुमच्या लाकडी कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. या दागिन्यांची किंमत जवळपास 2 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. याबात पनवेल शहर पोलीस ठाण्यात वैशाली यांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.