पेण येथे धडधडणार आव्हाडांची तोफ

| पेण | प्रतिनिधी |

32 रायगड लोकसभा निवडणुकीचे इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारची जाहीर सभा मंगळवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता महात्मा गांधी वाचनालय मैदान पेण येथे होणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मागे दुरचित्रवाहीनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये सुनिल तटकरे यांनी शरद पवारांना, ए.आर.अंतुले, जयंत पाटील कसे फसविले हे अगदी मुद्देसुद महाराष्ट्राला पटवून दिले होते. पेणकरांना त्याच मुद्देसुद बाबींची अपेक्षा असल्याने आव्हाड गणरायाच्या नगरित तटकरेंचे वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाहीत. या सभेसाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, इंदिरा काँग्रेसचे महेंद्र घरत, प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या उपस्थितीत सभा पार पडणार आहे. तरी या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version