कार्यकारी चिटणीसपदी जितेंद्र म्हात्रे

। उरण । वार्ताहर ।

शेतकरी कामगार पक्षाच्या उरण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारी चिटणीसपदी न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन माजी आ. बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी आदींनी केले.
जितेंद्र म्हात्रे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काम निष्ठेने केले. या त्यांच्या कार्याची नोंद शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतली. यामुळे येणार्‍या विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी अजून जोमाने काम करावे, यासाठी त्यांची उरण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारी चिटणीस या पदावर निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version