मंत्री अदिती तटकरेंच्या जनता दरबाराचे आमंत्रण नाही
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धनच्या आमदार तथा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा शुक्रवारी जनता दरबार होता, ज्यावेळी कुठल्याही पत्रकारांना अधिकृत आमंत्रण दिले नव्हते. जर असा दरबार घ्यायचा असेल तर पत्रकारांना आमंत्रण देणे हे पत्रकारांना अपेक्षित होते. श्रीवर्धनमधील अनेक समस्या पत्रकार नेहमी माध्यमातून मांडत असतात; परंतु श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी हे केव्हाही शासकीय कार्यक्रमाला पत्रकारांना आमंत्रण देत नाहीत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना जर का आमंत्रण नसेल, तर हे कार्यक्रम कसे होतात? याबाबत संशय व्यक्त होत आहे. यासाठी श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी खुलासा करावा. अन्यथा यापुढे कोणत्याही कार्यक्रमाला पत्रकारांना बोलवायचं नसेल तर नका बोलवू. श्रीवर्धन तालुक्यात अनेक पत्रकार आहेत, काही फक्त बातम्या लिहितात, काही फक्त कार्ड घेऊन फिरतात, त्यांना जर का ते जवळ करत असतील, तर त्यावरीलदेखील आमचा आक्षेप आहे.
अदिती तटकरे यांनी घेतलेला जनता दरबार खरोखर चांगली गोष्ट आहे. परंतु, या ठिकाणी जर का पत्रकारांना आमंत्रण नसेल, तर या दरबाराचा फायदा काय? जर अधिकारी संपर्क ठेवत नसतील, तर असे अधिकारी या ठिकाणी काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पत्रकार प्रत्येक वेळी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवतात; परंतु शासकीय अधिकारी याचा कोणताही अभ्यास करत नाहीत. यापुढे अशी गोष्ट घडल्यास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रीतसर तक्रार केली जाईल, असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.