| म्हसळा | वार्ताहर |
वसंतराव नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि बॅ.ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालय यांच्या विद्यमाने मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन मुलींची खो-खो स्पर्धा म्हसळा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जेएसएम महाविद्यालय अलिबाग अंतिम विजेता तर उपविजेता म्हणून व्ही.एन.सी. कॉलेज आणी बॅ.ए.आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा आणी तिसरा क्रमांक द.ग. तटकरे महाविद्यालय तळा यांनी पटकावला.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समिती विश्वस्त सचिव प्रतिनिधी फझल हलडे,उपनगराध्यक्ष संजय दिवेकर,कोकण झोन सचिव शशांक उपशेट्ये, सहसचिव कोकण झोन आर. एस. कदम,महाविद्यालय विकास समिती सदस्या निलम वेटकोळी,निजाम कागदी, नासिर मिठागरे,शकूर घनसार,शब्बीर काझी,नगरसेविका सरोज म्हशीलकर, मंगेश म्हशीलकर, प्राचार्य दिगंबर टेकळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सोनावणे यांनी सांगितले की, शासनाच्या अनेक योजना आणी उपक्रम असून त्या फार कमी प्रमाणात अमलात आणल्या जातात. त्या योग्य प्रमाणात अमलात आणल्या तर शैक्षणिक, सांस्कृतिक आणी क्रीडा विषयक प्रगती झपाट्याने होण्यास मदत होईल. खेळामुळे शरीर निरोगी आणी सुदृढ होण्यास निश्चितपणे मदत होते असा सल्लाही सोनावणे यांनी दिला. या स्पर्धाचा बक्षिस समारंभ नाजीम चोगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संपन्न झाला. पंच म्हणून कल्पेश पाटील, अमोल जाधव, आकाश खांडेकर, अमोल मोरे, लावण्य मगर, राकेश म्हात्रे, ऋतिक पवार यांनी उत्तम कामगिरी केली तर डॉ. फराह जलाल, वैशाली पाटिल, मुक्ता तुरे यांनी उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा दिली.