शेतकर्‍यांना न्याय द्यावा अन्यथा सिडकोवर हल्लाबोल

| चिरनेर | वार्ताहर |
सिडकोने चांणजे नागाव व रानवड केगाव सह सर्व गावातील भूसंपादनाची नोटीस रद्द करावी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या घराखालील जमिनी कायमस्वरूपी नावे कराव्यात. त्याचबरोबर नवी मुंबईच्या सेझच्या जमिनी परत घेऊन सिडकोने साडेबारा टक्केच वाटप करा अन्यथा या सिडकोच्या स्थापनादिनी म्हणजे 17 मार्च रोजी हल्लाबोल करू असा इशारा कामगार नेते भूषण पाटील यांनी महामेळाव्यात दिला आहे.

उरणच्या फडके सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या महामेळाव्यात हा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, कॉम्रेड भूषण पाटील, सुधाकर पाटील, काका पाटील, पाटील. अरविंद घरत, हेमालता पाटील,विकास नाईक, सीमा घरत. संतोष पवार. सरपंच चेतन गायकवाड आदी जण उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाने नवी मुंबईतील विकासाच्या नावाने चाणजे नागाव व रानवड तसेच इतर गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादनाच्या नोटीस 12 ऑक्टोबर 2022 ला सिडको ने काढली आहे. या जमिनीवर 70 ते 80 पाच हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांचे राहती घरी आहेत त्याचप्रमाणे अनेक जमिनी या दुबार पिकांच्या आहेत त्यामुळे शेतकरी अणि घरांची बांधकामे झाली आहेत. त्यांचे नुकसान होणार आहे शेतकरी व राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या घरांवर संकट आले आहे. या शेतकर्‍यांच्या जमिनीच्या संपादनाला शेतकर्‍यांचा विरोध आहे या जमिनी भाडेपट्टी ऐवजी कायमस्वरूपी मालिके हक्काने नाव निर्णय जाहीर करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Exit mobile version