चिंचवली ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी शेकापच्या ज्योत्स्ना भगत बिनविरोध

| अलिबाग | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या ज्योत्स्ना भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, उपसरपंच असलेल्या दीपाली कांबरी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्या जागी शेतकरी कामगार पक्षाच्या ज्योत्स्ना भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते विलास थोरवे, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष वैभव भगत, आकाश निर्मल राज्य चिटणीस सदस्य, संचालक सुहास भगत, नेरळ सोसायटी, उमरोली वॉर्ड अध्यक्ष रामदास शेलार, उकरुळ सदस्य सदानंद थोरवे, उकरुळ ग्रामपंचायत सरपंच वंदना संतोष थोरवे, सरचिटणीस राजेश भगत, सरपंच सुनीता अहिर, ग्रामपंचायत सदस्य ,मा उपसरपंच ऋषिकेश भगत, सुषमा बोराडे दीपाली कांबरी,रोशन पाटील, सुप्रिया भगत, ग्रामपंचायत अधिकारी हरिचंद्र निरगुडा व कर्मचारी वर्ग उपस्थिती होता ग्रामस्थ मा तंटा मुक्ती अध्यक्ष तुकाराम भगत रमेश नाईक, माजी उप सरपंच रमेश कांबरी,रामदास भगत,दशरथ भगत,संजय रसाळ,महेश भगत,राजू भगत,रामदास अ. भगत,महेश कोळंबे,माजी उप सरपंच रवींद्र भगत,सुरज भगत राजेश नाईक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ज्योत्स्ना भगत यांच्या निवडीबाबत पक्षश्रेष्ठींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version