आ. जयंत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील श्री कृष्ण युवक मंडळ रुईशेत भोमोली व गौरा मंडळ रुईशेत भोमोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता रायगड जिल्हा आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, राज्य कबड्डी असो.चे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, जि.प. माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील, माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, कुर्डूस माजी सरपंच संदीप पाटील, वाघोडे माजी सरपंच विवेक पाटील, सुनील पाटील, जनार्दन मेंगाळ, रुपेश उघडा, कृष्णा मेंगाळ, कुसुम शिद, पद्मा उघडा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक 12,000 आकर्षक चषक, द्वितीस 7000व आकर्षक चषक, तृतीय 5000 व आकर्षक चषक, चतृर्थ क्रमांक 5000 व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रुपेश उघडा, गणपत शिद, हरिभाऊ उघडा, हरी मेंगाळ, कृष्णा मेंगाळ, मधुकर शिद, धर्मा आवाटी, गणपत मेंगाळ, परशुराम मेंगाळ, बाळाराम मेंगाळ, कृष्णा मेंगाळ, लक्ष्मण शिद, दामा मेेंगाळ, राजेंद्र आवाटी, चंद्रकांत मेंगाळ आदींसह ग्रामस्थ मंडळ रुईशेत भोमोलीचे सभासद मेहनत घेत आहेत.