। चिपळूण । प्रतिनिधी ।
खेर्डी येथील राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेसच्या वतीने आयोजीत खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात कळकवणे संघाने विजेतेपद पटकावले. कळकवणे व कादवड संघात अतिम सामान 27-27 असा बरोबरीत झाला. परिणामी दोन्ही संघाना प्रत्येकी 5 चढाया देण्यात आला. यावेळीही सामना बरोबरीत होता. कादवड संघाच्या पाचव्या चढाईत कळकवणे संघाने पकड केल्याने कळकवणे संघ 1 गुणांनी विजेता ठरला.
आ.शेखर निकम व जिल्हा परिषद सदस्या आणि जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. खेर्डी बाजारपेठेतील कै. धोंडीरामशेठ दाभोळकर क्रीडा नगरीत तिन दिवस स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत तालुक्यातील 20 संघांनी सहभाग घेतला. बाद फेरीची स्पर्धा होती. सुरूवातीचे सामने एकतर्फी झाले. मात्र उपांत्य फेरीपासूनचे सामने रंगतदार झाले. या स्पर्धेत धामणवणे पिटलेवाडी संघाने चौथा, खेर्डी सुखाई स्पोर्टस तिसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कळकवणे आणि कादवड संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात कबड्डीचा थरार क्रीडा रसीकांना अनुभवायला मिळाला. दसपटीतले हे दोन्ही संघ मातब्बर. सुरवातीपासूनच या दोन्ही संघात गुणांची चढाओढ सुरू होती. शेवटच्या पाच मिनीटापर्यंत कादवड संघाकडे 7 गुणांनी आघाडी होती. मात्र कळकवणे संघात शांतपणे चढाई आणि पकडी करीत कादवड संघाचे एक-एक गडी बाद करीत लोन दिला. परिणामी शेवटच्या मिनीटात सामना 27-27 असा बरोबरीत राहीला. त्यानंतर दोन्ही संघाना प्रत्येकी 5 चढाया देण्यात आल्या. पहिल्या चढाईत कळकवणे संघाने 2 गुण मिळवले. कळकवणे संघाच्या 5 आणि कादवड संघाच्या चौथ्या चढाई दोन्ही संघाचे समान 5 गुण झाले होते. शेवटची चढाई कादवड संघाची होती. अंतिम चढाईत कादवड संघाचा खेळाडूची पकड झाल्याने कळकवणे संघ विजेता ठरला.
अंतिम सामन्यात दोन्ही संघाना क्रीडा रसीकांनी प्रोत्साहन दिले होते. स्पर्धेसाठी आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य स्टेज, वेळोवेळी फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. राष्ट्रवादीने आयोजित केलेली ही पहिलीच स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेला साजेसी ठरली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आदी विविध पक्षातील पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायीक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेला भेटी देत आयोजकांचे कौतुक केले. स्पर्धेच्या दुसर्या दिवशी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत आमदार शेखर निकमांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते खेर्डीतील माजी कबड्डीपट्टूंना गौरवण्यात आले. पारितोषीक वितरण कार्यक्रमास युवा नेते अनिरूद्ध निकम, अनिल दाभोळकर, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर, योगेश शिर्के, मिलींद कापडी, शिरीष काटकर, शौकत मुकादम, शशांक भिंगारे, रियाज खेरटकर, संभाजी यादव, सचिन भोसले, राकेश दाभोळकर, प्रशांत दाभोळकर, प्रणाली दाभोळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सन्मान सर्वोत्तम खेळाडूंचा
यावेळी कळकवणे संघाच्या संकेत घडशीला सर्वोत्तम खेळाडू ,उत्कृष्ट पकड म्हणून कल्पेश सुर्वे तर कादवट संघाच्या नईम चौगुलेला उत्कृष्ठ चढाईसाठी गौरविण्यात आले.