। रसायनी । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभादेवी-मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत घोडीवलीतील कुणाल पिंगळे याने 53 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. कुणाल पिंगळे हा येत्या काही महिन्यानंतर केरळ येथे होणार्या नॅशनल स्पर्धेकरीता सराव करीत आहे.