| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील देवपाडा गावातील कल्याणी तानाजी तुपे हिने प्रचंड मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. तिची पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. तिचे सर्वत्र कौतूक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य कुटूंबात वाढलेल्या कल्याणीने मिळविले यश हे तुपे परिवाराची मान अभिमानाने उंचावणारी ठरली आहे. पोलीस होण्यासाठी तिने जिद्द कायम ठेवली आणि पोलीस भरतीसाठी लागणारी शारीरिक तयारीही तिने तितक्याच चिकाटीने केली. अखेर तिच्या मेहनतीचं चीज झाले असून ती मुंबई पोलीस बनली आहे. बुधवारी रात्री कल्याणीचे देवपाडा गावात फटाके आणि गुलाल उधळून ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. ‘2024 मध्ये कर्जत येथील प्रहार पोलीस अकॅडमीत प्रवेश घेल्यानंतर अकॅडमीचे संचालक, आणि माझे पोलीस मामा अंकुश काळी यांचे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून परिश्रम घेतले आणि पहिल्याच प्रयत्नांत मला यश मिळाले’, अशा भावना कल्याणी तुपे हिने व्यक्त केल्या.
कल्याणी तुपे बनली मुंबई पोलीस
