कमलप्रीतची दिमाखदार थाळीफेक

उत्कृष्ट कामगिरीसह अंतिम फेरीत प्रवेश
| टोक्यो | वृत्तसंस्था |
भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने पात्रता स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाच्या कामगिरीसह तिने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. पात्रता स्पर्धेच्या ‘ब’ गटात समावेश असलेल्या 25 वर्षीय कमलप्रीतने तिसर्‍या आणि अखेरच्या प्रयत्नात 64 मीटर थाळी फेकली. त्यामुळे या गटातून अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमॅन (66.42 मीटर) हिच्यासह ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. कमलप्रीतने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, तर दुसर्‍या प्रयत्नात 63.97 मीटर थाळी फेकली. त्यानंतर तिसर्‍या प्रयत्नात 64 मीटर अंतरावर थाळी फेकली.

पात्रता स्पर्धेच्या ‘अ’ गटात समावेश असलेल्या अनुभवी सीमा पुनियाने 60.57 मीटर थाळी फेकत सहावा क्रमांक मिळवला. त्यामुळे एकूण 16व्या क्रमांकावरील सीमाचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, लांब उडीपटू श्रीशंकर मुरलीचे ऑलिम्पिक अभियान संपुष्टात आले. 22 वर्षीय श्रीशंकरने तीन प्रयत्नांत अनुक्रमे 7.69 मीटर, 7.51 मीटर आणि 7.43 मीटर लांब उडी घेतली.

Exit mobile version