परवानग्यांचा सोपस्काराला होणार उशीर
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेची शिवतीर्थ इमारत धोकादायक असल्याने तेथील प्रशासकीय कार्यालये आता कुंटे बाग तसेच अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली आहेत. या ठिकाणी असणारा ध्वजस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरभाऊ पाटील यांचा पुतळा, हुतात्मा स्तंभ आहेत. ते नवीन जागेत स्थलांतरीत करण्यासाठी काही तांत्रिक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट रोजी होणारा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मात्र शिवतीथर्र् इमारतीमध्येच होणार आहे. हा कार्यक्रम कदाचीत अखेरचा ठरणार आहे.
इमारत धोकादायक असल्याने ती सध्या खाली करण्यात आली आहे. या ठिकाणी असणारी बहुतांश विभागांची कार्यालये ही विविध जागेमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय देखील कुंटेबाग येथील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यात नेण्यात आले आहे. त्याचबरोबर सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, स्वच्छता व पाणी पुरवठा, समाज कल्याण अशी अन्य कार्यालये देखील याच ठिकाणी आणण्यात आली आहेत. प्रशासकीय कारभार सध्या अशा विविध ठिकाणाहून सध्या हाकला जात आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कोठे होणार याबाबत बर्याच चर्चा रंगत होत्या, परंतु स्वातंत्र्य दिनी होणारा झेंडावंदनाच्या कार्यक्रम हा शिवतिर्थ या मुळ इमारतीमध्येच होणार आहे. या ठिकाणी असणारा ध्वजस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरभाऊ पाटील यांचा पुतळा, हुतात्मा स्तंभ आहेत. ते नवीन जागेत स्थलांतरीत करण्यासाठी काही तांत्रिक बाबींची पुर्तता करावी लागणार आहे. काही कालावधीनंतर सरकारच्या सर्व परवानग्या मिळून कुंटे बाग येथील जागेत ध्वजस्तंभ उभारण्यात येईल. तेव्हा मात्र असे सरकारी कार्यक्रम नवीन जागेत पार पाडावे लागार आहेत. त्यामुळे या वर्षी होणार स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कदाचीत शेवटचा ठरण्याची शक्यता आहे.
कुंटेबाग येथे जागा उपलब्ध असली तरी, एवढ्या कमी वेळेत सरकारच्या परवानग्या आणि त्याठिकाणी जागेची स्वच्छता, ती एकसमान करणे तेथे ध्वजस्तंभासह पुतळे उभारणे हे शक्य होणार नाही, शिवतीर्थ इमारतीला अद्याप टाळे लावलेले नाही. या ठिकाणी असणार्या सभागृहात काही बैठक घेण्यात येतात. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन याच शिवतिर्थ इमारतीच्या ठिकाणी होणार आहे,
सत्यजीत बडे, अतिरिक्त सीईओ