| नवी दिल्ली | वार्ताहर |
मआता अगदी चांद्रयान -3 च्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्याचे सेन्सॉर गेले तरी विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सक्षम असणार आहे. त्याची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आता काहीही झालं तरी चांद्रयान-3 हे चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वास डॉ. एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे. विक्रम लँडरचे हे अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की कोणतीही अडचण आली तरी ते चंद्रावर यशस्वीरित्या लँड होण्यास सक्षम त्यांनी सांगितले. चांद्रयान-3 – इंडियाज प्राइड स्पेस मिशनफ या विषयावरील चर्चासत्रात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. भारताच्या तिसर्या चांद्रयान मोहीमेतील विक्रम लँडर हे 23 ऑगस्ट पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याचा अंदाज इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.