कर्जत नगरपरिषद सर्वसाधारण सभा संपन्न

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली, तर कर्जत-भिसेगाव भुयारी मार्गास स्वर्गीय अनंत काका जोशी मार्ग असे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.


नगर परिषदेची सर्वसाधारण सभा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती. ह्या सभेस नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, भारती पालकर, सुवर्णा निलधे, विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, बळवंत घुमरे, संचिता पाटील, पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळिंबकर, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, उमेश गायकवाड, शरद लाड, वैशाली मोरे, नितीन सावंत, संकेत भासे, हेमंत ठाणगे आणि मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील उपस्थित होते.


विषय पत्रिकेवर असलेल्या विकासकामांना सभेत मंजुरी देण्यात आली. तर विषय पत्रिकेवर असलेल्या 12 नंबरच्या विषयावर नगरसेवक विवेक दांडेकर यांनी दिलेल्या पत्रात कर्जत-भिसेगाव भुयारी मार्गास स्वर्गीय अनंत काका जोशी भुयारी मार्ग असे नाव देण्याचा विषय चर्चेला आला त्याच सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

Exit mobile version