सुरेखा भणगे यांच्याकडे कर्जत नगरपरिषदेचा पदभार

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची वसई विरार महानगरपालिकेवर उपायुक्त या पदावर पदोन्नती झाल्यामुळे माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे (शिंदे) यांच्याकडे कर्जत नगरपरिषदेचा पदभार देण्यात आला आहे.
माथेरानमध्ये मुख्याधिकारी उपलब्ध नसताना कर्जत येथील मुख्याधिकार्‍यांनी माथेरान येथे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम नेहमीच पाहत आले आहेत, पण यावेळी पहिल्यांदाच माथेरानच्या मुख्याधिकारी असलेल्या सुरेखा भणगे (शिंदे) या कर्जतच्या प्रभारी मुख्याधिकारी हा पदभार सांभाळणार आहेत. कर्जतचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांना वसई-विरार महानगरपालिकेमध्ये पदोन्नती मिळाली असून उपायुक्त पदावर ते रुजू सोमवारी रूजू झाले, त्यामुळे तातडीने कर्जतचे मुख्याधिकारी हे पद खाली होणार असल्याने येथून जवळ असलेल्या माथेरानच्या मुख्याधिकार्‍यांना प्रभारी मुख्याधिकारी म्हणून आपले काम सांभाळून कर्जत नगरपरिषदेचा कार्यभार सांभाळण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता माथेरानच्या मुख्याधिकारी यांच्याकडे माथेरान व कर्जत या दोन्ही नगरपरिषदेचा कार्यभार असणार आहे.

Exit mobile version