कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल विजेता

दिलखुश संघ आवास उपविजेता

| खारेपाट | वार्ताहर |

आकांक्षा रणजित राणे पुरस्कृत रायगड जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिलखुश क्रीडा मंडळ आवास पाठक आळी यांच्या वतीने सोमेश्‍वर मंदिर आवास येथील मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल व दिलखुश आवास यांच्यात झाला. यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल संघ अंतिम विजेता ठरला असून, दिलखुश आवास संघास उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले. विजेत्या संघास स्व. अर्चना प्र. राणे चषक व 50 हजार रुपयाचे पारितोषिक, उपविजेत्या संघास स्व. अर्चना राणे चषक व 30 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच तृतीय क्रमांक बिल्लालेश्‍वर किहीम संघ त्यांना 15 हजार रु. व चषक त्याचप्रमाणे चतुर्थ क्र. ओमसाई कलवे पेण संघास 15 हजार रु चषक विजेत्या संघास देण्यात आले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू नंदिनी वाघे कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल हिला सायकल, उत्कृष्ट चढाई कोमल पेढवी कळवे पेण, तसेच उत्कृष्ट पकड चैताली म्हात्रे किहीम, तसेच पब्लिक हिरो दर्शना पाटील दिलखुश आवास यांना पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आल्या.

तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन आवास येथील अभिलाशा अभिजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलखुश मंडळाच्या महिला पदाधिकारी, लावणी सम्राज्ञी अभिनेत्री प्रियांका शेट्टी व अनेक महिला उपस्थित होत्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरण वेश्‍वी ग्रा.पं. सदस्या रसिका मगर, आकांक्षा राणे, अलका तोडणकर कोळी, सिध्दीकाराऊळ, ज्योती पवार, सायली राऊळ, विनया नाईक, दिलखुश क्रीडा मंडळ आवास अध्यक्ष व सर्व सभासद, खेळाडू व ग्रामस्थ मंडळ आवास, दिलखुश संघाचे परिशिक्षक संदेश वर्तक, व्यवस्थापक दयानंद राऊळ, मंडळाचे सर्व पदाधिकारी, विविध मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक व महिला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अनेक महिला संघ सहभागी झाले होते.

Exit mobile version