। मुंबई । प्रतिनिधी ।
धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांचा आहे.
करुणा शर्मांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, करुणा मुंडे यांचा फॉर्म 30 ऑक्टोबरला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता. त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालीय ती करप्ट प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे. त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून, तिचा कुठे उल्लेख केलेला नाही. तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बर्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नसल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे.