फेसबुक पोस्ट महागात पडली; केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

। ठाणे । प्रतिनिधी ।
अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे भलतीच अडचणीत आली आहे. केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतकी विरोधात कळवा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. तिच्या फेसबुक पोस्ट प्रकरणाने तिच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले. दरम्यान, तिला पोतिस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी (दि.18) केतकीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच आता पोलिस कोठडीनंतर तिला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version