| पनवेल | प्रतिनिधी ।
महिलेच्या घरात घुसून आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी गोल्या उर्फ संतोष साहेबराव चव्हाण याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला त्यांच्या घरात बसलेल्या होत्या आणि त्यांचे पती घरात झोपले होते. यावेळी गोल्या उर्फ संतोष चव्हाण याने पीडित महिलेच्या घरात घुसून त्यांचा हात पकडला आणि जवळ ओढून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पतीला मारहाण केली. आणि पीडित महिलेच्या पोटात लाथ मारली.







