दुसऱ्या उपउपांत्य फेरीत केतकीचा मळा संघ विजयी

| अलिबाग | प्रतिनिधी |

दुसऱ्या उपउपांत्य फेरीचा क्रिकेट सामना रोहांशू 11 केतकीचामळा आणि प्रांशी 11 रोहा या संघात झाला. केतकीचा मळा या संघाने ही लढत जिंकली. 4.3 षटकात 82 धावा करीत केतकीचा मळा संघाने हा विजय मिळविला.

स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यु. व्ही. स्पोर्टस्‌‍ ॲकेडमी आयोजित पीएनपी चषक 2024 या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील उपउपांत्य लढत बुधवारी (दि.21) दुपारपासून सुरु झाली. दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना रोहांशू 11 केतकीचामळा आणि प्रांशी 11 रोहा या संघामध्ये झाला. रोहा संघाने सुरुवातीला फलंदाजी स्वीकारून सहा षटकात 78 धावा केल्या. विजयासाठी केतकीचा मळा संघासमोर 79 धावांचे आव्हान होते. या संघाने सुरुवातीपासूनच दमदार फटकेबाजी करीत 4.3 षटकात 82 धावा केल्या, आणि विजय आपल्याकडे खेचून आणला. या सामन्यात विघ्नेश कटोर याला सामनावीरचा बहूमान देण्यात आला. अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.

Exit mobile version