खोपोली भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

एकजण गंभीर जखमी; ५ वाहनांचे नुकसान
। खोपोली । प्रतिनिधी |
खोपोलीत मंगळवारी झालेल्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाला गंभीर दुखापत झाली. दोन्ही अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी यूवा टीमच्या सदस्यांनी खूप मेहनत घेतली. क्रेन / हायड्रा ऑपरेटर आणि शिळफाटा ग्रामस्थांनी सर्वतोपरी सहकार्य केले. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातामुळे खोपोली मार्गे येणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. या अपघातात चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले.

Exit mobile version