मुख्याधिकार्‍यांच्या मध्यस्थीने खोपोली नपा कर्मचारी कामावर

। खोपोली । वार्ताहर ।
नगरपारिषद मधील सर्व कर्मचारी वर्ग आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडत असताना शासनाने वेळोवेळी वेळकाडूपणी करीत असल्याने कर्मचार्‍यांंच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते, मात्र कामगारांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे खोपोलीचे प्रमुख मा.नगरसेवक किशोर पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पूर्ण पणे कमकाज बंद केले होते. पालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे यांनी शासनस्तरावर टप्प्याटप्याने मार्ग काढत असून येत्या काही आठवड्यात मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

पालिका मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे यांना दिलेल्या निवेदनात कर्मचारी संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचा उहापोह केला आहे.यासाठी पालिकेच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते त्यावर आज झालेल्या चर्चेत मेडिकल सेवा ,सातवा वेतन आयोगाचा फरक व प्रगती योजना लागू करण्यासाठी नगरविकास खात्याकडे शासनस्तर पाठपुरावा करण्यासाठी उपमुख्याधिकारी यांची टीम तयार केली असून लवकरच कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून त्या मार्गी लावण्याचे लेखी पत्र मुख्याधिकारी दुरे यांनी दिल्यावर कामगारांनी आंदोलन मागे घेत काम सुरू केले. 23 मे रोजी पूर्ण काम बंद चा इशारा दिला आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम पूर्णपणे बंद ठेवल्याने मुख्याधिकारी यांनी चर्चेसाठी बोलावून मार्ग काढून लेखी पत्र दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले आहे यासाठी माजी नगरसेवक व भारतीय कर्मचारी महासंघाचे नेते किशोर पानसरे यांनी मोलाची साथ लाभली असल्याचे मत भारतीय कामगार महासंघाचे स्थानिक कामगार कमिटी अध्यक्ष दिलीप सोनावणे यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version